पेनूर येथील जि.प. हायस्कूलमध्ये ‘आनंददायी खेळ’ उपक्रम
मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांचा अभिनव उपक्रम
लोहा| अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांमध्ये काहीशी साशंकता दिसून येते. मात्र, या पार्श्वभूमीवर काही जि.प. शाळा खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मागे टाकत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे पेनूर (ता. लोहा) येथील जिल्हा परिषद हायस्कूल.
विष्णुपुरी येथील शाळेला नावलौकिक मिळवून देणारे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांनी पेनूर येथील शाळेचा पदभार स्वीकारल्यानंतर शाळेचे चित्रच बदलून टाकले आहे. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी खेळ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी उन्हाळ्यात इकडे-तिकडे भटकण्याऐवजी शाळा आणि मैदानावर आनंदाने वेळ घालवत आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लाठी-काठी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, रग्बी, अॅथलेटिक्स, कॅरम, बुद्धिबळ, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बा...
