Tag: पुन्हा बिबट्याची दहशत

वारंगटाकळी शिवारात वासराचा फडशा; हिमायतनगर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत, शेतकरी भयभीत

वारंगटाकळी शिवारात वासराचा फडशा; हिमायतनगर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत, शेतकरी भयभीत

शेती
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत डोके वर काढताना दिसत असून, वारंगटाकळी शिवारातील ताज्या घटनेने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. सोमवारी मध्यरात्री वारंगटाकळी येथील शेतकरी आशिष ज्ञानेश्वर मोहिते यांच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली असून, या हल्ल्यामागे बिबट्याचा सहभाग असल्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी अक्षरशः दहशतीखाली वावरत आहेत. काही महिन्यांपूर्वीही याच परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ले करत मोठी दहशत निर्माण केली होती. आता पुन्हा त्याच पद्धतीने पाळीव जनावरांवर हल्ले सुरू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकरी रात्रभर शेतात जाण्यास धजावत नाहीत, तर मजूरही कामावर जाण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्...
error: Content is protected !!