Tag: पीपल्स कॉलेज

डॉ. विकास सुकाळे यांची प्राचार्यपदी नियुक्ती; पीपल्स कॉलेजमध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात

डॉ. विकास सुकाळे यांची प्राचार्यपदी नियुक्ती; पीपल्स कॉलेजमध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात

करियर
नांदेड | परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राचार्य पदाचा पदग्रहण सोहळा महाविद्यालयाच्या आयसीटी हॉलमध्ये शुक्रवारी उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. विकास सुकाळे यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर तसेच सौ. सुधा सुकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी पीपल्स कॉलेजच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्राचार्यपदी विराजमान झाल्याचे सांगितले. डॉ. विकास सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात विकासपर्व...
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पीपल्स कॉलेजमध्ये सत्कार

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पीपल्स कॉलेजमध्ये सत्कार

करियर, स्थानिक
नांदेड| हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी People's College Nanded येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी मंडळाची निवड नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सीए डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्षपदी अॅड. प्रफुल अग्रवाल, सचिवपदी प्रा. सौ. शामल पत्की तसेच सहसचिवपदी अॅड. प्रदीप नागपूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात पीपल्स महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रफुल अग्रवाल आणि सहसचिव अॅड. प्रदीप नागपूरकर यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!