नांदेड जिल्ह्यासाठी १७ व १८ जुलैला यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी १७ व १८ जुलै २०२६ रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
विजांच्या कडकडाटावेळी काय करावे?
हवामानाचा इशारा असल्यास अनावश्यक बाहेर जाणे टाळावे.
सुरक्षित इमारतीत तातडीने आश्रय घ्यावा.
सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सखल जागेत गुडघ्यात डोके घालून बसावे.
घरातील विद्युत उपकरणे बंद करावीत.
विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.
पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे.
काय करू नये?
विजांच्या कडकडाटावेळ...
