लोहा शहराच्या शांततेला गोळीबाराचे गालबोट; वाढती नशाबाजी, टवाळखोरांचे टोळके आणि पालकांसमोर नवे आव्हान
लोहा| लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहराच्या शांततेला गालबोट लागले आहे. पती-पत्नीतील वादातून एका तरुणाने अवैधरित्या मिळवलेल्या गावठी पिस्तुलातून पत्नीवर गोळीबार केल्याची घटना घडली. लोह्याच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात असून, वाढती नशाबाजी, तरुणांमधील बेशिस्त वर्तन आणि सामाजिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी केंद्र म्हणून लोहा शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, या घटनेमुळे शहराच्या सुरक्षित प्रतिमेला धक्का बसला आहे. शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या सुटल्यानंतर मुलींचा पाठलाग करणाऱ्या टवाळखोरांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याची गरज असून, पालकांनीही आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे ल...
