Tag: पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ

पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर तालुका महिला अध्यक्षपदी मुक्ताताई बनसोडे यांची नियुक्ती

पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर तालुका महिला अध्यक्षपदी मुक्ताताई बनसोडे यांची नियुक्ती

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| पारंपारिक लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने सौ. मुक्ताताई पांडुरंग बनसोडे यांची हिमायतनगर तालुका महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे (कामारीकर) यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष शाहीर रमेश नार्लेवाड हाळदेकर यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ हे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात कार्यरत असून लोककलावंतांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील सौ. मुक्ताताई बनसोडे यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील लोककलावंतांचे संघटन मजब...
error: Content is protected !!