पाच वर्षांतच महामार्गाला तडे ; स्पीड ब्रेकरअभावी अपघातांची मालिका! सोनारी फाट्यावरील नागरिकांची माजी आमदार जवळगावकरांकडे धाव
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावर १५ ते २० अपघातांत १० ते १२ जणांचा मृत्यू
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर ते भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन अवघी पाच वर्षे झाली; मात्र काही वर्षांतच या महामार्गाला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच गावांच्या मुख्य चौकात, बसथांब्यांवर आणि फाट्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक स्पीड ब्रेकर, बॅरिकेट किंवा सूचना फलक नसल्याने हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या मार्गावर आतापर्यंत झालेल्या सुमारे १५ ते २० अपघातांमध्ये १० ते १२ जणांना जीव गमवावा लागला असून, अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. तरीही संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
आठ दिवसांत तीन बळी; प्रशासन अजूनही झोपेत?
मागील काही दिवसांत टाकरा...
