Tag: पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने

श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

शेती
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; सुकत चाललेल्या खरीप पिकांना मिळाले जीवदान हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आणि ठिकठिकाणी देवदेवतांना पावसासाठी घातलेल्या साकड्यानंतर शनिवारच्या रात्रीपासून तालुक्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली. श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात झाल्याची भावना शेतकरी व नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील खरीप पिके सुकू लागली होती. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू केली होती, तर बहुतांश शेतकरी आभाळाकडे डोळे लाव...
error: Content is protected !!