Tag: न नांदेडमध्ये १०६७ रुग्णांना

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून नांदेडमध्ये १०६७ रुग्णांना ८.२१ कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून नांदेडमध्ये १०६७ रुग्णांना ८.२१ कोटींची मदत

आरोग्य
नांदेड (प्रतिनिधी) शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी आधार ठरत असून, नांदेड जिल्ह्यात आर्थिक वर्षात १,०६७ रुग्णांना सुमारे ८ कोटी २१ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या योजनेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हा कक्षांची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, अर्जांचा तातडीने निपटारा यामुळे मदत वितरण अधिक वेगवान व पारदर्शक झाले आहे. तसेच, सामंजस्य करार (MoU) आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून विविध रुग्णालये, धर्मादाय संस्था व दाते यांचे सहकार्य मिळत आहे. २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, नवज...
error: Content is protected !!