Tag: निपाणी सावरगाव

निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन; आमरण उपोषण मागे

निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन; आमरण उपोषण मागे

सामाजिक
रामदास पाटील सुमठणकर यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; प्रशासनाच्या आश्वासनाकडे ग्रामस्थांचे लक्ष देगलूर, गंगाधर मठवाले| निपाणी सावरगाव येथील स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठणकर यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडण्यात आला. निपाणी सावरगाव येथे ग्रामस्थांसाठी स्मशानभूमीची योग्य जागा उपलब्ध करून देण्यासह अंत्यसंस्कारासाठी आवश्यक शेड, रस्ता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रश्नासाठी आकाश पाटील कोकणे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, प्रश्न प्रलंबित राहिल्याने अखेर गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होत...
error: Content is protected !!