Tag: निधी अपहार प्रकरण

वाजेगाव ग्रामपंचायतीत निधी अपहार प्रकरण; सरपंच जमील अहमद शेख अटकेत

वाजेगाव ग्रामपंचायतीत निधी अपहार प्रकरण; सरपंच जमील अहमद शेख अटकेत

क्राइम
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीत शासकीय निधीच्या अपहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी सरपंच जमील अहमद शेख यांच्यासह तत्कालीन ग्रामसेवक आणि इतर संबंधितांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पत्रकार लतीफखान पि. पिरखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारीनुसार, सन 2010 पासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या सरपंच शेख यांनी विविध आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, 11 एप्रिल 2016 रोजी निधन झालेल्या महिलेच्या नावाने 6 ऑगस्ट 2016 रोजी बँकेतून 12 हजार रुपये काढण्यात आले. या व्यवहारात तत्कालीन ग्रामसेवक एस.एस. देशमुख यांची मदत घेतल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक खात्यातून 28 ऑगस्ट 2015 रोजी विविध धनादेशांद्वारे 1 लाख 44 हजार रुपये स्वतःच्या नावावर काढल्याचा आर...
error: Content is protected !!