डीपीडीसी बैठकीत आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा संताप; ‘लोडशेडिंग बंद करा, नाहीतर बैठकच थांबवा’
ग्रामीण जनता अंधारात, महावितरणचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’!
नांदेड, अनिल मादसवार| ग्रामीण भागातील जनता रात्रीच्या अंधारात आणि महावितरणचे अधिकारी मात्र जनतेच्या फोनपासून दूर, अशी संतप्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हदगाव–हिमायतनगरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रात्रीच्या लोडशेडिंगच्या प्रश्नावर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणला चांगलेच धारेवर धरले.
वारंवार सूचना देऊनही अधिकारी सुधारत नसतील तर काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करा; अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकेन किंवा बैठक इथेच समाप्त करावी, असा थेट इशारा आमदार कोहळीकर यांनी दिला.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित केला जात असताना शहरी भागाला तुलनेने वेगळे प्राधान्य का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शहरी भागात माणसे...
