Tag: नाव परिवर्तन

नाव परिवर्तन जाहिरात देयकांचा घोळ; दोन वर्षांपासून शेकडो बिले प्रलंबित असल्याचा आरोप

नाव परिवर्तन जाहिरात देयकांचा घोळ; दोन वर्षांपासून शेकडो बिले प्रलंबित असल्याचा आरोप

महाराष्ट्र
नवीन नांदेड | सिडको क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नाव परिवर्तन जाहिरातींच्या देयकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, विविध दैनिके, साप्ताहिके आणि पाक्षिकांची शेकडो देयके गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे माध्यम प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित विभागाने तात्काळ देयके लेखा विभागाकडे सादर करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाव परिवर्तन प्रक्रियेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातींची बिले संबंधित वृत्तपत्रांनी नियमानुसार तीन प्रतींसह सादर केली आहेत. ही बिले जावक विभागामार्फत स्वीकारण्यात आली असली, तरी ती पुढील प्रक्रियेसाठी वेळेत पाठविण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांतील मोठ्या प्रमाणातील देयके रखडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, नाव परिवर्तन विभागात अनेक ...
error: Content is protected !!