नामांकित ‘हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा’ एच.एस.सी. परीक्षेत डंका
यशाची परंपरा कायम!
हिमायतनगर (प्रतिनिधी) गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध अध्यापनासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकमेव नामांकित हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अनुभवी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे विद्यालयाने ८६.३५% निकालासह यशाची सुवर्ण परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयाच्या या यशामागे तालुक्यातील सर्वात अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्गाचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शाखेने ९५.२७% या उच्चांकी निकालाची नोंद केली असून, कला शाखेने ८०.९५% निकाल मिळवून तालुक्यात आपला नावलौकिक वाढवला आहे. विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कला शाखा: गुणांनुक्रमे अव्वल - कु. शिवानी...
