विनायक नगरात वारंवार वीज खंडित; नागरिकांची महावितरणकडे तक्रार
नांदेड| शहरातील विनायक नगर परिसरात मागील अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून काही वेळा कमी दाबाने वीज येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाब, जुन्या व धोकादायक वीज खांबांची अवस्था तसेच तारांमधील बिघाड यामुळे परिसरातील दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
श्री विनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, विनायक नगर येथील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे.
परिसरात वीजेचा भार वाढल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असून स्वतंत्र डीपी (ट्रान्सफॉर्मर) बसवण्याची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिक...
