नांदेड रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला गती; ‘पिट लाईन’ मालटेकडीला हलविण्याचा मार्ग मोकळा?
नांदेड| हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, स्थानकातील तीन ‘पिट लाईन’ मालटेकडी रेल्वे स्थानकावर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
सध्या नांदेड स्थानकाच्या मुख्य आवारात असलेल्या पिट लाईनवर रेल्वे गाड्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणी केली जाते. या लाईनवर गाड्या अनेक तास उभ्या राहत असल्याने प्लॅटफॉर्म विस्तारासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या तिन्ही पिट लाईन मालटेकडी येथे हलवल्यास नांदेड स्थानकावर अतिरिक्त प्लॅटफॉर्मसाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे.
भविष्यात ‘वंदे भारत’सारख्या अत्याधुनिक रेल्वे सेवांसाठी आवश्यक सुविधा उभारणे, तसेच पुढील २० ते ३० वर...
