Tag: नांदेड रेल्वे परिसर

नांदेड रेल्वे परिसरात ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; वन महोत्सव २०२६ ला उत्साहात प्रारंभ

नांदेड रेल्वे परिसरात ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; वन महोत्सव २०२६ ला उत्साहात प्रारंभ

महाराष्ट्र, तेलंगणा
'एक पेड माँ के नाम' उपक्रमातून हरित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल नांदेड, अनिल मादसवार| हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान, वन महोत्सव २०२६ आणि 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत नांदेड रेल्वे परिसरात तब्बल ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधत सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड आणि मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम विभागीय वन अधिकारी संदीप चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक नितेश निघडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कल्याण राजू, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. एम. के. श्रीनिवासा, तसेच रेल्...
error: Content is protected !!