Tag: नांदेड मनपा

100 दिवस कृती आराखड्यांतर्गत नांदेड मनपाकडून पावसाळापूर्व नालेसफाईला वेग

100 दिवस कृती आराखड्यांतर्गत नांदेड मनपाकडून पावसाळापूर्व नालेसफाईला वेग

सामाजिक
नांदेड| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांमध्ये संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा करण्याच्या उद्देशाने महापौर सौ. कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत आणि सभागृह नेते ॲड. महेश कानकदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘100 दिवस कृती आराखडा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आपत्ती सौम्यीकरणासाठी स्वच्छता विभागामार्फत पावसाळापूर्व तयारीला वेग देण्यात आला असून, शहरातील छोटे व मोठे नाले जेसीबी व पोकलेन मशिनच्या सहाय्याने साफ करण्यात येत आहेत. आयुक्त महेशकुमार डोईफोडे, उपआयुक्त नितीन गाढवे (स्वच्छता) आणि सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 02, 05, 08, 09, 13, 17 व 20 मधील पावसाळ्यात पाणी साचणारे व वाहणारे नाले स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. मागील दोन आठवड्यांपासून कच्चे व पक्के नाले यांची व्यापक स्वरूपात साफसफाई केली जात असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून...
आनंदनगर ते शोभानगर सीसी रोड: काम शून्य, पण कोट्यवधींचे बिल क्लिअर

आनंदनगर ते शोभानगर सीसी रोड: काम शून्य, पण कोट्यवधींचे बिल क्लिअर

महाराष्ट्र, स्थानिक
नांदेड, गोविंद मुंडकर | आनंदनगर चौक ते शोभानगर या सीसी रोडचे काम प्रत्यक्षात सुरूच नाही, रस्ता अजूनही खड्ड्यांनी भरलेला आहे; मात्र कागदोपत्री सर्व काही सुरळीत दाखवत तब्बल १ कोटी ७९ लाख ८६ हजार ४९३ रुपये बिल १० मार्च २०२६ रोजी अदा करण्यात आले. या धक्कादायक प्रकारामुळे नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “काम नाही, पण पैसे हो” हीच मनपाची नवी ओळख ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संबंधित अधिकाऱ्यांनी “मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करू” अशी हमी दिली होती. मात्र प्रत्यक्षात रस्ता आजही खड्डेमय आहे. प्रश्न असा की, काम झालेच नाही, तर बिल कोणत्या कामाचे काढले? याहून गंभीर बाब म्हणजे, याच रस्त्यासाठी यापूर्वीही २०२२ मध्ये दीड कोटींचा वर्क ऑ...
error: Content is protected !!