Tag: नांदेड-भोकर

नांदेड-भोकर मार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा! आ. श्रीजया चव्हाण यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

नांदेड-भोकर मार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा! आ. श्रीजया चव्हाण यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड ते भोकर या वर्दळीच्या मार्गावरील सिताखंडी घाटात सतत होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत, या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. आ. श्रीजया चव्हाण यांनी या पत्रात घाटातील तीव्र वळणे, ब्लाईंड स्पॉट्स आणि अतिवेगाने धावणारी वाहने यामुळे प्रवाशांच्या जिवाला सातत्याने मोठा धोका निर्माण होत असून, जीवितहानीच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त करुन काही मागण्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या आहेत. यामध्ये सर्व अपघातप्रवण क्षेत्रे आणि ब्लाईंड स्पॉट्सवर वाहनचालकांना स्पष्ट दिसतील असे धोक्याचा इशारा देणारे मोठे फलक लावणे. तसेच धोकादायक वळणांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रबर स्ट्रिप्स बसवण्याची ...
error: Content is protected !!