Tag: नांदेड जिल्हा रुग्णालय

नांदेड जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक MRI मशीनचे लोकार्पण; रुग्णांना मोफत तपासणीची सुविधा

नांदेड जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक MRI मशीनचे लोकार्पण; रुग्णांना मोफत तपासणीची सुविधा

आरोग्य
नांदेड | महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे अत्याधुनिक एमआरआय (MRI) मशीनचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या नव्या सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता उच्च दर्जाची तपासणी सेवा शासकीय रुग्णालयातच मोफत उपलब्ध होणार आहे. या एमआरआय मशीनचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबीटकर यांनी राज्यातील सात जिल्ह्यांतील एमआरआय सुविधांचे ऑनलाईन लोकार्पण केले. कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आनंद तिडके पाटील बोंढारकर, माजी आमदार अमर राजुकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अतुल सावे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळावी हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. नव्याने सुरू झालेल्या या एमआरआय सुविधेमुळे रुग्णांना मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज उरणार...
error: Content is protected !!