Tag: नांदेड एज्युकेशन सोसायटी

नांदेड एज्युकेशन सोसायटी व दयानंद शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक करार

नांदेड एज्युकेशन सोसायटी व दयानंद शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक करार

करियर
नांदेड | मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्राला नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे. आता या संस्थेने लातूरमधील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेसोबत भागीदारी करत विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या करारामुळे सायन्स महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. दोन्ही संस्थांमध्ये अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रम आणि अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. सोमवारी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेला भेट देऊन त्यांच्या शै...
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पीपल्स कॉलेजमध्ये सत्कार

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पीपल्स कॉलेजमध्ये सत्कार

करियर, स्थानिक
नांदेड| हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी People's College Nanded येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी मंडळाची निवड नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सीए डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्षपदी अॅड. प्रफुल अग्रवाल, सचिवपदी प्रा. सौ. शामल पत्की तसेच सहसचिवपदी अॅड. प्रदीप नागपूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात पीपल्स महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रफुल अग्रवाल आणि सहसचिव अॅड. प्रदीप नागपूरकर यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!