नांदेड आकाशवाणी केंद्राच्या बळकटीकरणासाठी अशोकराव चव्हाण सरसावले
“तरंग लांबी वाढविणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी दिल्लीस्तरावर पाठपुरावा करणार”
नांदेड| माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांनी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या विकासासाठी सकारात्मक आणि ठोस भूमिका घेत केंद्राच्या विविध प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्याची ग्वाही दिली आहे. नांदेड आकाशवाणी केंद्राची तरंग लांबी वाढविणे, ग्रामीण भागात स्पष्ट आणि दर्जेदार प्रसारण उपलब्ध करून देणे, तसेच स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पुन्हा व्यापक व्यासपीठ मिळावे यासाठी आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांसह प्रसार भारतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुणवंतराव पाटील, गोविंदराव मुंडकर, भाऊराव मोरे, बसवराज वडिले आणि प्रकाश कराळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी 3 जून 2026 रोजी बुधवारी सविस्तर चर्चा करताना चव्...
