विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बेमुदत साखळी उपोषण
नांदेड | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या २४ जणांच्या मृत्यू प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करावी, या मागण्यांसाठी सीटू कामगार संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ जुलैपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांना जबाबदार धरून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नांदेड विभागीय उपायुक्त बाबू हमीद तडवी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेले ताडी दुकान बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा आणि विविध गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विभागीय, खातेनिहाय तसेच मालमत्तेची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आ...
