नवज्योत फाउंडेशनच्या तीन दिवसीय संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप
नांदेड (गोविंद मुंडकर) नवज्योत फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय संस्कार शिबिराचा समारोप रविवारी दुपारी उत्साहात पार पडला. या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून सभागृह तिन्ही दिवस विद्यार्थीांनी खचाखच भरलेले होते.
शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर समाजातील विविध अनिष्ट प्रवृत्ती आणि समस्यांवरही वक्त्यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना सजग आणि जबाबदार नागरिक बनण्याचे मार्गदर्शन केले.
रविवारी झालेल्या समारोप सत्रात वेदांत देशमुख, सरदार उदयपाल, अश्विनी मंठाळकर ,सरदार हरजीत सिंघ आणि सरदार दीपसिंह फौजी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांच्या प्रेरणा...

