आषाढी एकादशीनिमित्त हिमायतनगरात भक्तिमय वातावरण; नगरप्रदक्षिणा दिंडीत विठूनामाचा गजर
हिमायतनगर (वाढोणा),उत्कर्ष मादसवार| यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडून पीकपाणी भरभरून यावे आणि शेतकरी तसेच सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करीत आषाढी एकादशीनिमित्त हिमायतनगर (वाढोणा) शहरातील शेकडो भाविकांनी विठ्ठल-रुख्माई व श्री परमेश्वराचे दर्शन घेतले.
श्रीक्षेत्राचा दर्जा प्राप्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकाळापासून आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, दि. २५ रोजी मंदिरातील विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वारकरी संप्रदायातील महिला-पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अनेक भक्तांकडून केळी व राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी ६ वाजता पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून विठ्ठल-रुख्माई अभिषेक सोहळा पार पडला. मंदिराचे संच...
