हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात अधिकमासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
संगीतमय भागवत व गणेश पुराण कथेमुळे भक्तिमय वातावरण
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर (वाढोणा) येथे पवित्र अधिकमास (धोंड्याचा महिना) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भव्य संगीतमय भागवत कथा ह.भ.प. वैष्णवी दिदी गोड सोनखेडकर यांच्या मधुर वाणीने दिनांक २३ मे ते २९ मे २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार आहे. यानंतर ३० मे रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यात भव्य संगीतमय गणेश पुराण कथा ह.भ.प. सुनिल महाराज आष्टीकर (सेलू) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ जून ते ११ जून २०२६ दरम्यान दुपारी २ ते ५ या व...
