Tag: धर्माबाद बससेवा सुरू करा

शहापूर मार्गे धर्माबाद बससेवा सुरू करा; गावकऱ्यांची मागणी

शहापूर मार्गे धर्माबाद बससेवा सुरू करा; गावकऱ्यांची मागणी

सामाजिक
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर परिसरातील नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांना धर्माबादच्या बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहापूर मार्गे धर्माबाद बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. धर्माबाद येथील बाजारपेठेत विविध प्रकारच्या शेतीमालाला चांगली मागणी असल्याने शहापूर परिसरातील शेतकरी भाजीपाला तसेच विविध पिकांची लागवड करून तो माल विक्रीसाठी धर्माबाद येथे घेऊन जातात. मात्र शहापूरहून धर्माबादला जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वनाळी मार्गे प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च दोन्ही वाढत आहेत. शहापूर परिसरातून धर्माबादकडे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र थेट बससेवा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच शेतकरी यांना विशेषतः गैरसोयीचा सामन...
error: Content is protected !!