देवस्थान इनाम कायदा स्थगित; मंदिर महासंघाच्या लढ्याला मोठे यश
महसूलमंत्री बावनकुळे यांच्या निर्णयाचे स्वागत; मंदिर हिताच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका
मुंबई,प्रतिनिधी| राज्यातील प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप २०२६’ कायदा स्थगित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे केली असून, या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिर समिती, विश्व हिंदू परिषद आणि राज्यभरातील मंदिर विश्वस्तांनी स्वागत केले आहे.
मंदिरांच्या हक्कांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मानले जात आहे. मंदिर विश्वस्तांच्या बैठका, निवेदने, हरकती, पत्रकार परिषद आणि देवस्थान भूमी संरक्षण परिषदांच्या माध्यमातून शासनापर्यंत मंदिरांची बाजू प्रभावीपणे पोहोचविण्यात आली होती.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा नि...
