Tag: देगलूर

देगलूर रुग्णालयासाठी २२.९७ कोटींचा निधी मंजूर; ‘श्रेय’च्या राजकारणाने वातावरण तापले

देगलूर रुग्णालयासाठी २२.९७ कोटींचा निधी मंजूर; ‘श्रेय’च्या राजकारणाने वातावरण तापले

राजकारण
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उन्नतीसाठी २२.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र या निर्णयानंतर ‘श्रेय’ कोणाचे, यावरून राजकीय वर्तुळात चांगलाच वाद रंगला असून वातावरण तापले आहे. या निधीतून देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार असून, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देगलूरसह परिसरातील ग्रामीण व सीमावर्ती भागातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा काही माध्यमांतून करण्यात आला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या दाव्याला देगलूरचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी ठाम विरोध ...
देगलूर पोलिसांची सट्टा जुगारावर धडक; ४ आरोपींवर कारवाई, लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

देगलूर पोलिसांची सट्टा जुगारावर धडक; ४ आरोपींवर कारवाई, लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड/देगलूर (प्रतिनिधी) अवैधरित्या ऑनलाईन सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर देगलूर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, देगलूर शहराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत काही जण ऑनलाईन क्रिकेट सट्टा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक मारोती श्रीराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ५ एप्रिल रोजी सायंकाळी छापा टाकला. छाप्यात आरोपी मोबाईलद्वारे ऑनलाईन आयडीवर पैसे लावून सट्टा खेळत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाईल (किंमत सुमारे ३१ हजार रुपये), एक स्कूटी (१० हजार रुपये) तसेच ४,४८० रुपये रोख रक्कम असा एकूण १,०५,४...
श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी

श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी

मनोरंजन, सामाजिक
देगलूर | देगलूर शहरातील एकमेव सार्वजनिक उद्यान असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान च्या सुशोभीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे यांची भेट घेऊन त्यांनी उद्यानाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच कुटुंबीयांना फिरण्यासाठी शहरात पर्यायी जागा नसल्यामुळे या उद्यानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे नव्याने टेंडर काढून मुलांसाठी खेळण्यांची आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेत हा विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला घेण्याचे आश्वासन दिले असून संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शहरातील मुलांमध्येही या उ...
error: Content is protected !!