नांदेड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाका; गुटखा, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थांसह लाखोंचा साठा जप्त
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर विशेष मोहीम; प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर कारवाई, अनेक दुकाने सील
नांदेड | सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई मोहीम राबवत गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य अन्नसाठ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मागील आठवडाभर चाललेल्या या विशेष मोहिमेत लाखो रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गोपनीय माहिती आणि नियमित तपासणीच्या आधारे जिल्ह्यात विविध भागांत अचानक छापे टाकण्यात आले.
दि. २९ मे रोजी नांदेडच्या जुना मोंढा परिसरातील एम. ए. शरीफ या आस्थापनाची तप...
