दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन उदासीन ; ८ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
नांदेड| जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन (नोंदणी प्रक्रिया सुरू), दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, तसेच बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील थकीत मानधन तात्काळ जमा करावे, आमदार व खासदार निधीतून दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करावा, DPDC अंतर्गत १% निधीचा वापर करावा, जिल्हाधिकारी बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी, दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकाऱ...

