Tag: दारूबंदी

दारूबंदीसाठी वझरा शेख फरीदमध्ये उठाव; नाहरकत प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

दारूबंदीसाठी वझरा शेख फरीदमध्ये उठाव; नाहरकत प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

महाराष्ट्र
माहूर/नांदेड | माहूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या वझरा शेख फरीद गावात दारूबंदीच्या मागणीने जोर धरला असून, गावातील महिलांसह नागरिकांनी दारू विक्री केंद्रे बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दारू दुकाने सुरू करण्यासाठी देण्यात आलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासह विविध प्रक्रियांबाबत चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दोन बार अँड रेस्टॉरंट, एक बिअर शॉपी तसेच मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू विक्री होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता पालक व्यक्त करत आहेत. गावात प्रसिद्ध शेख फरीद दर्गा असल्याने विविध धर्मीय भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे गावातील सामाजिक व धार्मिक वातावरणावर दारू विक्रीचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दारू विक्री केंद्रांना राज...
error: Content is protected !!