नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालयाची दयनीय अवस्था; मद्यप्राशन करणाऱ्यांच्या विळख्यात परिसर
नांदेड, गोविंद मुंडकर| शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय हे भावी शिक्षक घडविणारे महत्त्वाचे केंद्र असले तरी सध्या या महाविद्यालयाच्या परिसराची दयनीय अवस्था समोर येत आहे. विशेषतः महाविद्यालयाच्या इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीजवळील मोकळी व आडोशाची जागा मद्यप्राशन करणाऱ्या टोळ्यांसाठी अड्डा बनल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे.
सन 2007 पासून नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या इमारतीत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
मात्र, महाविद्यालयाच्या परिसरातील परिस्थिती चिंताजनक आहे. इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीखालील जागा ही मोकळी व आडोशा...
