Tag: दक्षिण मध्य रेल्वे

रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष जाळू नका; दक्षिण मध्य रेल्वेचे शेतकऱ्यांना आवाहन

रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष जाळू नका; दक्षिण मध्य रेल्वेचे शेतकऱ्यांना आवाहन

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड विभागातील धेंगली पिंपळगाव – मानवत रोड रेल्वे मार्गावर २५७/८२ किमी अंतरावर लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सुदैवाने या आगीमुळे रेल्वे वाहतुकीला तात्काळ अडथळा निर्माण झाला नाही, मात्र मोठा धोका टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक तपासानुसार, शेतातील पिकांचे अवशेष जाळल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामप्रतिनिधी आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्या समन्वयाने आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष किंवा शेतीतील कचरा जाळणे अत्यंत धोकादायक आहे. अशा आगी वाऱ्यामुळे वेगाने पसरून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर (OHE), सिग्नल यंत्रणा, तसेच रेल्वेच्या इतर महत्त्वाच्या सुविधांचे मोठे नुकसान करू शकतात. यामुळे प्रवाशांच्...
नांदेड रेल्वे विभागाची धडक मोहीम; 35 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई, दंड वसुली

नांदेड रेल्वे विभागाची धडक मोहीम; 35 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई, दंड वसुली

क्राइम
नांदेड | रेल्वे स्थानके व गाड्यांमधील अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी (दक्षिण मध्य रेल्वे ) South Central Railway च्या नांदेड विभागाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. दि. 22 ते 28 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 35 अनधिकृत विक्रेते/फेरीवाले आढळून आले असून त्यांच्यावर रेल्वे नियमांनुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत EFT द्वारे ₹13,860 इतका दंडही वसूल करण्यात आला. वाणिज्य निरीक्षक व तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी वाशीम–अकोला, परभणी–परतूर, परभणी–परळी, जालना–छत्रपती संभाजीनगर, नांदेड–आदिलाबाद, नांदेड–वाशीम तसेच छत्रपती संभाजीनगर–मनमाड या मार्गांवर सघन तपासणी केली. या मोहिमेचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ व नियमानुसार सेवा उपलब्ध करून देणे हा असून, अनधिकृत व अस्वच्छ खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे हेही मुख्य ध्येय असल्याचे रेल्वे प्रश...
“ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत आरपीएफची धडाकेबाज कारवाई

“ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत आरपीएफची धडाकेबाज कारवाई

महाराष्ट्र, स्थानिक
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा बल (RPF) तर्फे “ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सन्मान जपण्याचे उल्लेखनीय कार्य सातत्याने सुरू असून विविध घटनांमध्ये तात्काळ आणि संवेदनशील कारवाई करत गरजू प्रवाशांना मदतीचा हात दिला जात आहे. दि. २७ मार्च रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता पुर्णा रेल्वे स्थानकावर एक युवती घरातून पळून आल्याची माहिती महिला कॉन्स्टेबल गुड्डीबाई मीणा यांना मिळाली. तत्काळ कारवाई करत त्यांनी युवतीला सुरक्षितपणे आरपीएफ पोस्टवर आणून चौकशी केली. संबंधित युवती ही मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील असल्याचे समोर आले. पुढील प्रक्रिया म्हणून तिला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून नंतर परभणी येथील ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या स्वाधीन करण्यात आले. याच दिवशी आणखी एका घटनेत, पंजाबमधील बठिंडा येथील मानसिक तणावाखालील महिला नांदेड स्थानकावरून बेप...
error: Content is protected !!