Tag: तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल

हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल; आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल; आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

राजकारण
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत दिनांक 8 ते 12 जून दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण निश्चित होणार असून, यासाठी महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शासनाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी दिली आहे. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या देखरेखीखाली संबंधित ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केला जाणार असून, सरपंच, सदस्य, राजकीय कार्यक...
error: Content is protected !!