तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे क्रीडांगणे पडली ओस; प्रशासनाचे दुर्लक्ष!
नियमित प्रशिक्षण, स्पर्धांचे नियोजन ठप्प; होतकरू खेळाडूंचे नुकसान
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्रीडांगणांवर सध्या सामसूम वातावरण दिसून येत असून, तालुका क्रीडा अधिकारी पद रिक्त असल्याचा फटका खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना बसत आहे. नियमित मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धांचे नियोजन आणि क्रीडा उपक्रमांना अपेक्षित गती मिळत नसल्याने अनेक क्रीडांगणे अक्षरशः ओस पडल्याचे चित्र आहे.
देगलूर तालुक्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील युवक-युवतींमध्ये विविध खेळांविषयी मोठी आवड आहे. अनेक होतकरू खेळाडू नियमित सराव करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत आहेत. मात्र, त्यांना आवश्यक प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्पर्धांची योग्य माहिती व नियोजन मिळत नसल्याने त्यांच्या क्रीडा गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळत नसल्याची खंत पालक व क्रीडाप्रेमींमधून...
