तामसा येथील समाधीस्थळाच्या विकासाला गती; उपोषणकर्त्यांच्या प्राथमिक मागण्या मान्य
सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी १ कोटींचा निधी मंजूर
हदगाव /नांदेड| स्वराज्याचे सरसेनापती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या तामसा (ता. हदगाव) येथील समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करून भव्य व उच्च दर्जाचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी छावा मराठा संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले की, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नेताजी पालकर समाधीस्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून, मा. हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून यापूर्वी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच समाधीस्थळ परिसरातील छोट्या नदीवरील पूल आणि संपर्क रस्त्याचे कामही विकास आराखड्यात समाविष्ट करून मार्गी लावण्यात येणार आहे.
दरम्यान, ...
