शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संभाजी जाधव तर उपाध्यक्षपदी गणेश सूर्यवंशी यांची निवड
हदगांव, गौतम वाठोरे| तालुक्यातील हरडफ जिल्हा परिषद शाळेची शालीय व्यवस्थापन समितीची निवड ११ रोजी गावाच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हरडफ येथे नुकतीच गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नवीन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून संभाजी पाटील जाधव उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी शिक्षणप्रेमी सदस्य शिवाजी जाधव यांची निवड करण्यात आली गेल्या दोन वर्षापासून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवन मोरे उपाध्यक्ष गौतम वाठोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता नवीन कार्यकारणी निवडण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष इतर सर्व नवनिर्वाचित सदस्य. यांची निवड करण्यात आली.
गावाच्या भविष्याची पायाभरणी
गावाची शाळा म...
