टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नांदेड | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने बुधवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
२८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका एक दिवस आधीच फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डिवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा निषेध क...
