डांबर कुठे? शहापूर-सुडगी फाटा रस्त्यावर मुरुमाची ‘डागडुजी’!
खड्डे बुजविण्याऐवजी मुरुम-गिट्टीचा थर; पावसात रस्ता पुन्हा चिखलमय होण्याची शक्यता — कामाच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांचा सवाल
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर ते सुडगी फाटा या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खड्ड्यांमध्ये डांबर व गिट्टी टाकून रोलरच्या साहाय्याने दबाई करण्याऐवजी चक्क मुरुम व गिट्टी पसरवून रस्ता दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होऊनही रस्त्याचा प्रश्न कायम राहणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहापूर ते सुडगी फाटा मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत असून दुचाकीस्वार आणि एसटी बससह इतर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श...
