Tag: ठरलेला खडकी रस्ता

‘मृत्यूचा सापळा’ ठरलेला खडकी रस्ता; दुरुस्त न झाल्यास २५ जूनला रस्ता रोको करण्याचा इशारा

‘मृत्यूचा सापळा’ ठरलेला खडकी रस्ता; दुरुस्त न झाल्यास २५ जूनला रस्ता रोको करण्याचा इशारा

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) फाटा ते खडकी (बा.) गाव तसेच खडकी (बा.) ते घारापूर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल ८ ते १० वर्षांपासून रस्ता खड्डेमय व धोकादायक बनला असून, तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण न झाल्यास २५ जून रोजी नांदेड–किनवट महामार्गावर खडकी फाट्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. समस्त खडकी (बा.) येथील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावासाठी हा रस्ता जीवनवाहिनी असला तरी आज तो ‘मृत्यूचा मुख्य दरवाजा’ बनला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना दररोज हिमायतनगरला शिक्षणासाठी जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर गंभीर बाब म...
error: Content is protected !!