Tag: ट्रॅक्टर पलटी

ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार.! कंधार – मुखेड रोडवरील दुर्दैवी घटना

ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार.! कंधार – मुखेड रोडवरील दुर्दैवी घटना

क्राइम
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील कंधार - मुखेड रोडवर अंबुलगा येथील (दांडाचा महादेव) येथे रोडवरून जाणारा स्वराज ७४४ कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर हेड हा दि.२८ मे रोज गुरुवारी दुपारी ३:०० च्या सुमारास पलटी होऊन चालक बालाजी गोविंद कदम रा. हिप्परगा (शहा) ता.कंधार जि.नांदेड यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दि २८ मे रोज गुरुवारी कंधार - मुखेड रोड वरून ट्रॅक्टर हेड हे कुठेतरी शेत मशागत कामासाठी जात असताना कंधार तालुक्यातील अंबुलगा - सावरगाव (नि.) येथे दुपारी ३:०० च्या सुमारास चालकाच्या हलगर्जीपणामुळे व वाढत्या वेगामुळे ट्रॅक्टरवरील ताबा सुटून सदरचा ट्रॅक्टर हेड हा पलटी होऊन, चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली. घटनेचे वृत्त कळताच कंधार पोलिसांनी तात्काळ घटन...
error: Content is protected !!