ज्या हातांनी मुलांना वाढवलं, त्याच हातांनी पाजलं विष! मनुला बुद्रुक येथील हृदयद्रावक घटनेने जिल्हा हादरला
हदगाव, गौतम वाठोरे| माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना हदगाव तालुक्यातील मनुला बुद्रुक येथे उघडकीस आली आहे. आई-वडिलांनीच आपल्या दोन चिमुकल्या मुलांना विषारी औषध पाजल्याच्या आरोपामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी चिमुकली जीवनासाठी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धांत भालेराव आणि त्यांची पत्नी शुभांगी भालेराव हे आपल्या दोन मुलांसह राहत होते. १४ जूनच्या रात्री त्यांनी मुलांना खोकल्याच्या औषधाच्या बहाण्याने विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा प्रकार बाहेर येऊ नये म्हणून घराला कुलूप लावून स्वतः आतच राहिल्याची माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी आजोबा नंदू भालेराव घरी आल्यानंतर घरातील परिस्थिती पाहून हादरले. दोन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती आणि त्यांना उ...
