बेटक बिलोली जि.प. शाळेचे शिक्षक आयुबखान पठाण यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा उत्साहात
हिमायतनगर, प्रतिनिधी| बेटक बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आयुबखान चाँदखान पठाण हे ३१ जुलै रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींच्या वतीने सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा १ ऑगस्ट रोजी नरसी येथील आदित्य गार्डन (फंक्शन हॉल) येथे उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला प्रकाश पाटील भिलवंडे, सरपंच सौ. सविताताई राहुल पाटील नकाते, शिक्षण विस्तार अधिकारी उद्धव ढगे, केंद्रप्रमुख उमाकांत डिंगणे, केंद्रप्रमुख कपिलेश्वर नलबलवार, वीरभद्र मिरेवाड, मंगनाळे, राहुल पाटील नकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सदस्य सुरेश पवार, रामकिशन पवार, गजानन नकाते, माजी चेअरमन माणिकराव भरकांड तसेच पोलीस पाटील भागवत पाटील भ...
