जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे
नांदेड| राज्यातील सर्व घटकांचा विचार करून शेतकरी, रोजगार, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून ‘विकसित भारत 2047’च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, महापौर कविता मुळे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कामगार दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला असून १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना व १६ मे ते १४ जूनदरम्यान घरनोंदणी प्रक्रिया होणार आहे. या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आव...
