नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २३ पैकी ११ जागा बिनविरोध
१२ जागांसाठी निवडणुकीची रंगत; प्रमुख मतदारसंघांत दुरंगी लढती
नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २३ पैकी ११ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, उर्वरित जागांसाठी निवडणुकीची रंगत वाढली आहे. विविध मतदारसंघांमध्ये उमेदवार आमनेसामने आल्याने सहकार क्षेत्रातील या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कंधार मतदारसंघातून प्रणिता देवरे चिखलीकर, लोहा मतदारसंघातून आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नायगावमधून श्रीनिवास चव्हाण, मुखेडमधून आमदार तुषार राठोड, किनवटमधून आमदार भीमराव केराम, उमरीमधून मारोतराव कवळे आणि बिलोलीमधून मीनल पाटील खतगावकर यांचा समावेश आहे.
महिला प्रवर्गातून सुशिलाताई हणमंतराव बेटमोगरेकर आणि पूनम राजेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच ‘ब’ प्रवर्गातून शिवराम लूटे आणि ‘क’ प्रवर्गातून कैलास देशमुख गोरठेकर यांचीही बिनविर...
