Tag: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

करियर
कारला येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य हिमायतनगर, प्रतिनिधी| 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्याच अनुषंगाने कारला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून, सर्व विद्यार्थ्यांना समानतेची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे. यंदाही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी कारला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
error: Content is protected !!