जुन्या लोहा शहरात जाणारा रस्ता होणार प्रशस्त; वर्षानुवर्षांची समस्या मार्गी, सहा मालमत्ताधारकांनी दिली जागा
लोहा | लोहा शहरातील जुन्या भागात जाणाऱ्या अरुंद रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडले असून, मस्जिद परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. ग्रामपंचायत काळात तसेच नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतरही वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला हा प्रश्न आता नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या टीमच्या पुढाकारामुळे सुटताना दिसत आहे.
जुन्या शहरात जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमण, नाल्यांपुढे वाढवलेल्या पायऱ्या आणि मनमानी बांधकामांमुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. मात्र नगर परिषद प्रशासनाने धाडसी भूमिका घेत या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करत काही नागरिकांनी स्वखुशीने स्वतःच्या मालकीची जागा रस्त्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
या संदर्भात नगराध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्...
