जिल्हा विकासासाठी 867.59 कोटींच्या आराखड्याला मंजुरी; गुणवत्तापूर्ण कामांवर भर
नांदेड,अनिल मादसवार | जिल्ह्यातील विकासकामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ८६७.५९ कोटी रुपयांच्या नियोजनाला मंजुरी देण्यात आली. तसेच सन २०२५-२६ मधील ७९०.५७ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली.
बैठकीत शाळांमधील शौचालये, अतिरिक्त वर्गखोल्या, स्मशानभूमींसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि इतर मूलभूत सुविधांवरील कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपूर्ण विकासकामे लवकर पूर्ण करावीत तसेच शाळांच्या जा...
