चार महिन्यांपासून आधार केंद्र बंद; देगलूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे बोंबाबोंब आंदोलन
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड नोंदणी केंद्र मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या औचित्याने पोस्ट कार्यालयासमोर बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी केले.
देगलूर तालुक्यातील नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयातील हे एकमेव सुरू असलेले आधार केंद्र होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ते बंद असल्याने आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती तसेच इतर आधारसंबंधित कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना आणि विविध प्रशासकीय कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरि...
